Aaichi Aarti Lyrics in Marathi |आईची आरती | – Hirkani – Marathi Movie 2019 – Asha Bhosle & Amitraj Lyrics
Singer | Asha Bhosle & Amitraj |
Movie | Hirkani |
Music | Amitraj |
Song Writer | Sandeep Khare |
The Aaichi Aarti lyrics in Marathi is a heart warming Song from the 2019 movie Hirkani, directed by Prasad Oak. Hirkani features Sonali Kulkarni and Ameet Khedekar.
Aaichi Aarti Lyrics in Marathi :
आईची आरती –
दमलेला जीव पुन्हा उमलून येई
कानी येते हाक जेव्हा आई
आई आई आई
पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल
कान घेती क्षणक्षण पिलांची चाहूल
झोपेमध्ये सुद्धा… मन जागे-जागे राही
कानी येते हाक जेव्हा आई
आई आई आई आई
आई आई
मऊ कुशीतून बळ पोलादाचे देते
घास भरवाया उगा बोबडे बोलते
भातुकलीमध्ये संसार मांडते
रातभर थोपडते अंगाई जागते
हिच्या डोळ्यातला चंद्र मावळत नाही
आई आई आई आई
आई आई
जगणे दुर्घट झाले असते संसारी
नसतिस जर तू येथे माझी कैवारी !
कैशी घडली असती जन्माची वारी
पोशियले जर नसते मज तू तव उदरी !
आई जय आई तू जननी सुखदायी
त्रैलोक्यातुन अवघ्या तुळणा तव नाही
आई ..जय आई !! ।।ध्रु।।
प्रसन्नवदना करुणा सत्वर तव तत्पर
बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर
सर्व चराचर नांदे सुखरुप सुखधामी
शोधित तुजला येतो स्वर्गहि विश्रामी !!
आई जय आई तू जननी सुखदायी
त्रैलोक्यातुन अवघ्या तुळणा तव नाही
आई.. जय आई ! ।।१।।
श्रीमंती बहु त्याला,जन्म सुखी त्याचा
ढळतो ज्यावर वारा तुझिया पदराचा !
श्वासाश्वासामागे उभि तव पुण्याई
सार चार वेदांचे गाई अंगाई !
आई जय आई तू जननी सुखदायी
त्रैलोक्यातुन अवघ्या तुळणा तव नाही
आई… जय आई !! ।।२।।
धारियला हा देह झाला जगि धन्य
प्राशुनिया तव अमृतरुपी हे स्तन्य !
उत्पत्ती लय स्थिती रूपे तव तीन्ही
किमया अदभुत तव ही जाणियली कोणी !!
आई जय आई तू जननी सुखदायी
त्रैलोक्यातुन अवघ्या तुळणा तव नाही
आई… जय आई !! ।।३।।