Ha Chandra Tujhya Sathi Lyrics in Marathi | – Swapnil Bandodkar Lyrics
Singer | Swapnil Bandodkar |
Singer | Ajay – Atul |
Music | Bedhund |
Song Writer | Chandrashekhar Sanekar |
Ha Chandra Tujhya Sathi song is a top Marathi song with high popularity album Bedhund . Ha Chandra Tujhya Sathi lyrics in Marathi are written by Chandrashekhar Sanekar. It is sung by Swapnil Bandodkar and composed by Ajay-Atul .
Ha Chandra Tujhya Sathi Lyrics in Marathi
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी
आरास ही तार्यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अशा वेळी मज याद तुझी आली
ये ना
मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्षांना घेऊन ये तू
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू
वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे
नाव तुझे माझ्या ओठांवर येते
फूल जसे की फुलताना दरवळते
इतके मज कळते, अधुरा मी येथे
चांदरात ही बघ निसटून जाते
बांधीन गगनास झुला
जर देशील साथ मला
ये ना
मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्षांना घेऊन ये तू
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू
हे क्षण हळवे एकान्ताचे, दाटलेले माझ्या किती भवताली
चाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तू मजला ते ऐकावे
होऊन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनी न तुझे वाजे
जीव माझा व्याकुळला
दे आता हाक मला
ये ना
मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्षांना घेऊन ये तू
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू