Lakh Lakh Chanderi Lyrics in Marathi | लखलख चंदेरी – Ajay Gogavale , Swapnil Bandodkar Lyrics

Lakh Lakh Chanderi Lyrics in Marathi | लखलख चंदेरी – Ajay Gogavale , Swapnil Bandodkar Lyrics


Lakh Lakh Chanderi Lyrics in Marathi


Singer Ajay Gogavale , Swapnil Bandodkar
Singer Ajay – Atul
Song Writer Shrirang Godbole

Lakh Lakh Chanderi song is a top Marathi song . Lakh Lakh Chanderi lyrics in Marathi are written by Shrirang Godbole, It is sung by Ajay Gogavale , Swapnil Bandodkar and composed by Ajay-Atul .


Lakh Lakh Chanderi Lyrics in Marathi

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या

तो काळ विसाव्या शतका आरंभीचा
या जगी चित्रपट बनू लागले होते
वारसा अम्हां जरी होता अष्टकलांचा
हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते
पण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने
फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले
अर्जुनास जैसे लक्ष्य एकची डोळा
जे अशक्य होते शक्य तयांनी केले
मग कथा घेउनी हरिश्चंद्र राजाची
या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले
शनिवार तीन मे एकोणिसशे तेरा
भारतभूमीवर चलतचित्र अवतरले
नव तेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या

प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा
बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा
चित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा
आनंदाचा झोत असे हा संस्कृतीच्या पाऊलखूणा
घटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगुळा
बघताबघता व्यापुनी जातो देहभान अमुचे सगळा
रडणार्‍याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची
पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची
आयुष्याच्या क्षणाक्षणांशी बांधतसे रेशिम नाते
आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते
जीवाशिवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या

आता न अम्हां कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे !

Facebook
YouTube
Instagram
WhatsApp