Marathi Balbharati Kavita lyrics for second standard (2006)

 

Marathi Balbharati Kavita lyrics for second standard (2006)


खाली दिलेल्या कविता महाराष्ट्र शासनाच्या बालभारती मराठी पुस्तक इयत्ता दुसरीच्या आहेत ज्या २००६ साली अभ्यासक्रमाचा भाग होत्या.आपण त्यांचा आस्वाद घ्यावा आणि आठवणींमध्ये गुंगून जावे…

Marathi Balbharati Kavita lyrics


आपला राष्ट्रध्वज 

प्राणप्रियाहूनि प्रिया असे हा

आम्हा तिरंगा झेंडा 


तीन रंगांचे अर्थ शोधूनि 

पाठीवरती मांडा


त्याग शौर्य आणि क्रांतीचा 

पाठ केशरी सदा द्यायचा 


रंग पांढरा मध्ये झळकता ,

म्हणे मनातून हवी शांतता 


हिरव्याची तर एकाच आशा 

समृद्धीने नटवा देशा 


प्रगती नाही गतीवाचूनि 

जाणून घ्यावे चक्रामधूनी 


तीन रंगांचे अर्थ असे हे 

पाटावरती मांडा 


प्राणाहुनही प्रिया असे हा 

आम्हा तिरंगा झेंडा 



पंख मला जर असते 


पंख मला जर असते दोन 

पतंग उडवीत बसेल कोण ?


मीच पाखरू झालो असतो 

आभाळावर गेलो असतो 


निळी निळाई आभाळाची 

पंखावरती माखायची 


चार चांदण्या छोट्या छोट्या 

तोडून केल्या असत्या गोट्या 


विमान मागे पडले असते

हार खाऊन रडले असते 


सगळे माझा करतील हेवा

पंख मला , पण फुटतील केव्हा?




गरगर गिरकी 


गरगर गिरकी वाऱ्याची फिरकी 

फिरकी गेली नभात , नभातल्या मेघात

मेघ लागले झरू, चिंब झाले तारू 

तरू चिंब झाले पावसात न्हाले 

नाले तरू , धारा , झोंबतो गार वारा 

वारा भराभरा , फिरे गरागरा

गरगर गिरकी वाऱ्याची फिरकी 



चांदोबा

चांदोबा चांदोबा येशील का?

तुझ्याघरी खेळायला नेशील का ?


छान छान आहे तुझी गाडी रे

हरणाची आहे त्याला जोडी रे

गाडीतून फिरायला नेशील का ?


ढगातून कापूस फुटला रे

मऊ मऊ बिछाना टाकला रे

रातभर लोळायला देशील का ?


चांदोबा घरी तुझ्या दिवाळी 

ताऱ्यांचे दिवे किती आभाळी 

तुझ्या घरी फराळाला नेशील का ?


माणूस आला जरी भेटून तुला 

चांदोमामा भेटशील कधी मला 

निंबोणीच्या झाडामागे येशील का ?



चिमणीचा घरटा


चीक चिव चिव रे।  तिकडे तू कोण रे?

कावळे दादा , कावळे दादा 

माझा घरटा वेळास बाबा 

नाही ग बाई चिमुताई 

तुझा घरटा कोण नेई ?


कपिल मावशी कपिल मावशी 

घरटे मोडून तू का जाशी ?

नाही ग बाई मोडीन कशी ?

मऊ गावात दिले तुशी। 


आता बाई पाहू कुठे ?

जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचार्या चिमणीला 

सगळे टपले चालण्याला 


चिमणीला मग पोपट बोले 

का ग तुझे डोळे ओले ?

काय सांगू बाबा तुला?

माझा घरटा कोणी नेला?


चिमुताई  चिमुताई 

माझ्या पिंजऱ्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा ?

सगळं शिन जाईल तुझा


जालो तुझा पिंजरा मेला 

त्याचे नाव नको मला 

राहीन मी घरट्याविना 

चिमणी उडून गेली राना 

माड उडवी पतंग 


एक होता माड 

भारी भारी उनाड

बुंध्यापाशी खेळणारा 

पोर जसा द्वाड 


पोरांनी ताणली होती 

फिरकीची दोरी 

पतंगाने घेतली अस्मानात भरारी


काटा काट खेचाखेच 

चालली होती धमाल

गम्मत पाहता पाहता

माडाने केली कमाल


गोते खात जेव्हा एक 

पतंग खाली आला 

झावळ्यांच्या हातानी 

खेचून घेतलं त्याला 


पोरांची हुर्यो ऐकून 

वारा धावत आला 

माड आपला ऐटीत 

पतंग उडवू लागला 


गती 

चालत चालत जायचा माणूस 

आपल्या दोन पायांवर 

त्यात केवढी गती आली

चाकाचा शोध लागल्यावर 


येण्याजाण्यासाठी लोक 

वप्परात असतात बैलगाडी 

टांगा ओढतो टपटप घोडा

त्यालाच म्हणतात घोडागाडी


पायंडल मारता धावायची 

दोन चाकांची सायकल 

पेट्रोल भरता पळू लागली

विगत मोटारसायकल 


दोन गावे जोडायला 

बसगाडी सडकेवर 

इकडून टिकड्डे गावोगाव 

लोक जातात भराभर 


कोळसे खात धावायची 

आगगाडी रुळावर 

त्यात झाली सुधारणा

आता चालते विजेवर 


सागराच्या सफारीसाठी

जहाज आणि बोटी 

आभाळाच्या भरारीची 

माणसाला हौस मोठी 


पंख नसून माणसाने 

झेप घेतली आभाळात 

विमानातून फिरू लागला 

देश आणि परदेशात 


फिरणे असे सोपे झाले 

जमीन पाणी आकाशात 

अंतराळयानामधून 

आता जाती अवकाशात 



माझी आई 

घंटा वाजता बंद होय शाळा 

घरी जायची घाई फार बाळा 


फुले रंगीत फांद्यावर आली

थांब ना रे बाळास त्या म्हणाली

बाळ बोले मला वेळ नाही 

घरी जायची असे फार घाई 


फुलपाखरू तिथे एक आले 

हट्ट खेळाचा खूप खूप चाले 

बाळ बोले मला वेळ नाही 

घरी जायची असे फार घाई 


झाड सोडूनि पक्षी येत खाली

गीत गौण त्यास मोह घाली

बाळ बोले मला वेळ नाही 

घरी जायची असे फार घाई 

सखे सोबती तुम्ही सर्व काही 

परी आवडरे मला फार आई