संख्यांचे गाणे | Sankhhyanche gane lyrics in Marathi
Sankhhyanche gane lyrics in Marathi
आई बाबा या या या
मामा काका या या या
मिळून सारे गाऊया
संख्यांच्या गावाला जाऊया
पोपटाला चोच एक
चुटकी वाजवून एक
चुटकी वाजवून पाहूया
संख्यांच्या गावाला जाऊया
सशाला कान दोन
टाळ्या वाजवू दोन
टाळ्या वाजवून पाहूया
संख्यांच्या गावाला जाऊया
रिक्षाला चाके तीन
गिरक्या घेऊ तीन
गिरक्या घेऊन पाहूया
संख्यांच्या गावाला जाऊया
टेबलाला पाय चार
उद्या मारू चार
उद्या मारून पाहूया
संख्यांच्या गावाला जाऊया
हाताला बोटे पाच
आम्ही करतो नाच
नाच करून पाहूया
संख्यांच्या गावाला जाऊया
झुरळाला पाय सहा
चित्रात मोजून पहा
मोजणी करून पाहूया
संख्यांच्या गावाला जाऊया
इंद्रधनुष्यात रंग सात
सुंदर दिसते आकाशात
रंग त्यात भरुया
संख्यांच्या गावाला जाऊया
छत्रीला काड्या आठ
पावसाशी पडेल गाठ
छत्री आपण उघडूया
संख्यांच्या गावाला जाऊया
घड्याळात वाजले नऊ
दादाने केला खाऊ
मिळुनी खाऊ खाऊया
संख्यांच्या गावाला जाऊया
झुकझुक झुकझुक संख्या गाडी
संख्यांची आम्हाला लागे गोडी
संख्याची गम्मत पाहूया
संख्यांच्या गावाला जाऊया